The Mind Gym Part 2 - मनाची व्यायामशाळा सदर २ Neha Kulkarni नेहा कुलकर्णी
Dairy of Love - प्रेमाची दुग्धशाळा
English translation available below.
राधा तिच्या आईवडिलांची लाडकी मुलगी होती. ती कोल्हापुरातच लहानाची मोठी झाली. राधाला लहानपणापासूनच प्राण्यांविषयी खूप प्रेम होतं. राधाच्या घरी असणाऱ्या कपिला गायीवर तिचा खूप जीव होता. राधाचे वडील एका कारखान्यात काम करत होते. राधाला मोठा भाऊ होता, तो नोकरीच्या शोधात होता. राधाचं सुद्धा शिक्षण पूर्ण होत होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राण्यांसाठी काहीतरी करण्याचा राधाचा विचार होता. अशातच एके दिवशी राधाच्या एका मैत्रिणीने सगळ्या ग्रुपला त्यांची दुग्धशाळा बघायला येण्याचं आमंत्रण दिले. राधाला प्राणी खूपच आवडत असल्याने ती विशेष खुश होती. दुग्धशाळेत गेल्यावर तिला दिसले कि गायींना बांधून ठेवलंय. गळ्यात आणि पायात देखील दोऱ्या होत्या. एक वासरू गायीचे दूध प्यायचा प्रयत्न करत होतं पण त्याला ओढून दुसरीकडे नेण्यात आलं. त्या हतबल आईच्या डोळ्यातून झिरपणारं पाणी आणि आईच्या दुधाला पारखं झालेलं वासरू राधाच्या डोळ्यांतून सुटलं नाही. तिने पाहिलं कि गायीचे दुध मशीन लावून काढलं जातंय. तिने तिच्या मैत्रिणीला याबद्दल विचारल्यावर ती म्हणाली “अगं, जर गायीचे पाय बांधले नाहीत तर ती मशीनने दूध काढू देत नाही. वासराला जर गायीजवळ ठेवलं तर आपल्याला जास्त दूध मिळत नाही. भरपूर दूध काढलं तर पैसे देखील भरपूर मिळतात. त्यासाठी असं करावंच लागतं.” राधाला मैत्रिणीचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. खरंच राधाची मैत्रीण खूप श्रीमंत होती पैश्याने पण राधाच्या मनात आलं , मनाच्या श्रीमंतीचं काय? जास्त पैसे कमावण्याचा नादात संवेदनशीलता हरवत चाललीये का?
राधाच्या मनात कपिलाचा विचार आला. राधाची आई रोज सकाळी खूप प्रेमाने कपिलाला आंजारून, गोंजारून तिच्याशी गप्पा मारते. कपिलाच्या वासराला म्हणजेच कान्हाला देखील माया करते. कान्हाला भरपूर दूध पिऊ देते आणि मगच कपिलाशी बोलता बोलता हाताने तिचं दूध काढते. कपिलाच्या डोळ्यांतून कधी पाणी आलेलं, कान्हाला कधी तिच्यापासून दूर केलेलं, कपिला आणि कान्हा कधी उदास झालेले, त्यांचे पाय बांधलेले राधाला आठवलं नाही. राधाच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. आईकडून राधा सुद्धा हे सगळं शिकली होती. कपिला आणि कान्हा त्यांच्या कुटुंबाचा खूप महत्वाचा भाग होते. राधाला समाधान वाटलं. मैत्रीण तिची दुगधशाळा किती मोठी आहे, त्यात किती गायी आहेत वगैरे बढाया मारण्यात मग्न होती आणि तेवढ्यात राधाला हे कळलं की तिला प्राण्यांसाठी जे करायचं होतं ते काय आहे. होय, राधाच्या मनात आलं स्वतःची दुग्धशाळा सुरु करायची. त्यात गायींना, वासरांना कुठलाही त्रास न देता. ज्याप्रमाणे कपिला, कान्हा त्यांच्या कुटुंबात खुश होते त्याप्रमाणे हळूहळू काही गायी, वासरं या कुटुंबात वाढवत जाउया असा विचार तिने केला.
राधा खूप खुश होती. कधी एकदा घरी जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगते असं तिला झाला होतं. घरी आल्या आल्या तिने आई, वडील आणि दादाला आपला विचार बोलून दाखवला. सगळ्यांना हा विचार खूपच आवडला, खास करून दादाला. तो म्हणाला मी पूर्णवेळ हाच व्यवसाय करेन. राधाच्या वडिलांनी त्या दोघांना कल्पना दिली की तुमचा विचार खूप चांगला आहे, पण खूप कष्ट करावे लागतील आणि खूप संयम ठेवण्याची तयारी असेल तरच या वाटेवरून जा. सगळ्यांनी मिळून पुढे काय करायचं ते ठरवलं. घरासमोरच्या अंगणात आधी मोठा गोठा बांधला. त्यांनी अजून २ गायी आणि २ म्हशी घरी आणल्या. आधी फक्त कपिला आणि कान्हा होते पण आता कुटुंब मोठं झालं होतं आणि काम देखील वाढलं होतं. त्यांच्या दुगधशाळेचं ब्रीदवाक्य मात्र पक्कं होतं " प्रेमाची दुग्धशाळा". हळूहळू कामाला सुरुवात झाली होती. इतर दुग्धशाळांच्या मानाने दूध कमी होतं, पण समाधान मात्र नक्कीच जास्त होतं.
बोध
स्वामी रामदासांनी सांगितल्याप्रमाणे राधा आणि तिचे कुटुंब षड्रिपूंपासून (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) लांब राहिले. त्यामुळे ते दुःख, इर्ष्या यांपासून देखील लांब राहिले.
राधाच्या मैत्रिणीच्या चुकीच्या वागण्याने दुखावून न जाता, राधाने प्रेम,शांतता आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबला. ज्याप्रमाणे चंदन उगाळल्याशिवाय, झिजल्याशिवाय त्याचा सुगंध दरवळत नाही त्याचप्रमाणे राधा आणि तिच्या दादाने कष्ट आणि संयमाची तयारी ठेवून नवीन चांगल्या व्यवसायाची सुरुवात केली.
स्वामी रामदास सांगतात ज्याप्रमे राधाने मैत्रिणीच्या श्रीमंतीकडे पाहून असूया केली नाही किंवा चुकीचा मार्ग न स्वीकारता चांगल्या कामाचा मार्ग अवलंबला कारण आपण जसे करतो तसे आपल्याला भरावे लागते हे राधाला माहित होतं. राधा आणि तिचे कुटुंब नेहमी सद्सदविवेकाने वागत राहिले, कष्टात पण सुख मानत राहिले त्यामुळे अवघड मार्ग देखील हळूहळू सोपा होत जाईल.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Radha was the beloved daughter of her parents. She was living in the Kolhapur city. Radha had a special love for animals since childhood. She loved her pet cow Kapila so much. Radha’s father used to work in a factory. Her mother was a homemaker. She had an elder brother who was in search of a suitable job. Radha was about to complete her graduation. After that she was willing to work for animals. One day, Radha’s friend invited her group of friends to visit her Dairy farm. Radha was very excited for this visit as she loved the animals. During her visit to the dairy farm, Radha observed that the cows’ legs were tied by ropes and they didn’t seem to be happy. While a calf was trying to drink cow’s milk, it was dragged to the other side and its legs were also tied. It was saddening to see the crying, helpless calf and the cow. When Radha asked her friend about this, her friend’s reply made her feel disappointed. Her friend told that they use machines to milk cows. For that they need to tie their legs and if they allow calves to be around cows then they will not get more milk. More milk helps them earn more money. Radha felt pity for her rich friend as she was rich only by money but not at heart. She could not help but think that people should be sensitive enough instead of just running behind money.
Radha started thinking about her pet cow Kapila.
Everyday Radha’s mother lovingly and caringly talks to Kapila and her calf Kanha. They all worship and pray to Kapila. Radha’s mother let Kanha drink the milk it needs and then only she milks the cow. Now Radha has also learnt all these things from her mother. She could not recollect Kapila crying anytime or her calf Kanha been kept away from her or they have been tied by their legs. Kapila and Kanha seemed happy to Radha. All these thoughts made Radha feel happy and content that the Kapila and Kanha are integral part of their happy family. While her friend was busy boasting about her big dairy farm and its turnover, Radha realized what career related to animals she would like to pursue. Yes, Radha wanted to start her own dairy farm, where cows, buffaloes and their calves will not be hurt. As Kapila, Kanha were happy to be part of their family, Radha decided to add more cows, buffaloes and calves gradually to their family.
Radha was very happy and excited to tell this idea to her family. As soon as she reached home she discussed the idea with her family. Everyone loved the idea, specially her brother. He decided to partner with Radha in her business. Radha’s father, being an experienced wise man encouraged them, at the same time advised them to be really consistent, patient and put all the hard work required for their business. They all decided the plan of action. They built a big cowshed in the space available in front of their home first. They bought two cows & two buffaloes. Previously there were only Kapila & Kanha but now it was a big family, resulting in more work and care for their pet members. However Radha’s motto was fixed to build a dairy farm to be built out of love. Gradually the dairy work has started. Milk at their dairy farm was less compared to other dairies but it was definitely more satisfactory.
Moral
As Shri Swami Ramdas advises, Radha & her family did not stuck in Shadripus (Lust, Anger, Greed, Infatuation, Ego and Jealousy). This kept them away from grief, comparison, hatred. Instead of getting hurt.
Radha chose to follow the path of goodness, truth, peace and love. Unless sandal wears out itself, its aroma does not spread around, similarly Radha & her family did all the hard work required and started their new business.
As Swami Ramdas advises, Radha neither felt jealous for her friend’s richness nor chose her friend’s way to hurt animals & earn more money because she knew that what you sow, you shall reap.
Radha & her family always acted with complete awareness, consciousness, and compassion. They accepted the tough times & did all the hard work happily. This helped them to ease their journey.
Comentários