The Mind Gym - मनाची व्यायामशाळा - 1
- Neha Kulkarni
- Oct 14, 2020
- 5 min read
Updated: Oct 15, 2020
English translation available below.
१० ऑक्टोबर या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने एक नवीन सदर सुरु करत आहे. माईंड जिम म्हणजेच “मनाची व्यायामशाळा”. माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी ज्याप्रमाणे सुदृढ शरीराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे किंबहुना जास्तच सशक्त मनाची आवश्यकता असते. शरीर सुदृढ करण्यासाठी आपण व्यायाम करतो मग मनाची काळजी घेण्यासाठी मागे का रहायचं? चला तर मग माझ्यासोबत या मनाच्या व्यायामशाळेत...
मला असा वाटतं कि आपण भारतीय खूप नशीबवान आहोत कारण संस्कृती, श्लोक, वेद, पुराण, स्तोत्रं, मंत्र यांचा सुसंपन्न वारसा आपल्याला न मागताच मिळालाय. आपल्याही नकळत अगदी लहानपणापासून आपण श्लोक, आरत्या म्हणत असतो. हो अगदी अर्थ काळात नसला तरीही. हे श्लोक, स्तोत्रं, मंत्र आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा देतात. आपली नाळ त्या परमेश्वराशी जोडतात. जरा विचार करा, जर फक्त उच्चार केल्याने आपल्याला एवढं छान वाटतं तर या श्लोकांचा, स्तोत्रांचा अर्थ समजून घेऊन तो आचरणात आणला तर त्याच नक्कीच कित्येक पटीने फायदा होईल.

म्हणूनच या सदरात मी श्री स्वामी रामदास रचित श्री मनाचे श्लोक यातील प्रत्येक ५ श्लोक आणि त्याचा अर्थ सांगण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करणार आहे.
पण तुम्ही म्हणाल आम्हाला बोअर होतं हे असा का ही वाचायला, म्हणायला आणि म्हणूनच मी हा प्रयत्न जरा हटके म्हणजेच गोष्टीच्या माध्यमातून करणार आहे जेणेकरून हा संपन्न वारसा आपल्या लहानग्यांपर्यंत सुद्धा पोहोचेल, त्यांना आवडेल अशा स्वरूपात...

रामपूर गावात विवेक नावाचा एक मुलगा राहत होतं. विवेकाचे कुटुंब शेतकरी होते. विवेकने गावातच सगळं शिक्षण पूर्ण केले. विवेकाचे मित्र नोकरी शोधण्यासाठी शहरात जाणार होते. पण विवेक मात्र गावातच राहून सेंद्रिय शेती करणार होता. शेतीमध्ये होणारा रसायनांचा अतिवापर, त्यामुळे पिकांचं होणारं नुकसान, मातीवर होणारे दुष्परिणाम पाहून विवेकला वाट वाटत असे. त्याच्या आईबाबांची सुद्धा सेंद्रिय शेती करण्याची इच्छा होती मात्र भांडवल, फायदा, नुकसान, प्रवाहाविरुद्ध जाण्याची भीती यामुळे त्यांची हिम्मत मात्र झाली नाही. विवेकने मात्र ती हिम्मत करायची ठरवली. विवेकच्या मित्रांनी मात्र त्याच्या या निर्णयाला त्याचा मूर्खपणा समजून त्याच्याशी बोलणं बंद केलं. नातेवाईक, शेजारीपाजारी देखील त्याला हे कसा चुकीचं आहे त्यात किती नुकसान आहे हे समजावू लागले. विवेकने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि ज्याप्रमाणे प्रत्येक कामाची सुरुवात तो देवाला प्रार्थना करून आणि त्याचे आभार मानून करायचा त्याचप्रमाणे केली. ज्या कामाने त्याचा, त्याच्या कुटुंबाचा आणि समाजच फायदा आणि विकास होणार आहे ते काम नक्कीच यशस्वी होणार याची त्याला खात्री होती.
विवेकने सेंद्रिय शेतीचा संपूर्ण अभ्यास करून त्याचा आराखडा बनवला, आईवडिलांनी त्याचा भविष्यासाठी साठवलेले पैसे त्याने सेंद्रिय शेतीसाठी वापरण्याचं ठरवलं. शेजारच्या गावात जाऊन सेंद्रिय बी बँकेतून बियाणं आणलं. सेंद्रिय खत कसा तयार करायचं याचा मोठ्या गावातून प्रशिक्षण घेतलं. विवेकने रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पिकांना पुरेसं पाणी मिळणार होतं. असा करता करता विवेकने सेंद्रिय शेती करून पाहिलं पिक घेतलं. रसायनविरहित असल्याने पिक उत्तम दर्जाचं आणि चवीचं होतं. सेंद्रिय धान्य आणि भाज्यांना शहरात चांगली मागणी आहे हे विवेकने ऐकलं होतं त्यामुळे जिथे सेंद्रिय खतांचं प्रशिक्षण घेतलं तिथल्या सरांच्या ओळखीतून त्याने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून विक्री केली. त्यामुळे त्याला चांगला नफा मिळाला. विक्री केलेला माल चांगला असल्याने त्याला चांगली मागणी मिळाली. थोड्या प्रमाणात का होईना विवेकच्या सेंद्रिय शेती व्यवसायाला सुरुवात झाली.
बोध
ज्याप्रमाणे पहिल्या आणि चौथ्या श्लोकात समर्थ सांगतात प्रत्येक कामाच्या आधी, ते काम करताना देखील कायम त्या देवाचे नाव घ्या त्याप्रमाणे विवेकने देखील देवाची प्रार्थना केली,त्यांचे आभार मानले.
समर्थ सांगतात भक्तियोगाला कर्मयोगाची जोड असावी त्याप्रमाणे विवेकने फक्त देवाचे नाव घेतले नाही तर त्याला पूरक योग्य कृती केली त्याने त्याला यश मिळाले.
स्वामी रामदास सांगतात कोणीही कितीही निंदा केली तरी तू सत्याच्या मार्गावर चालत राहा त्यावरून ढळू नकोस कारण तू परमेश्वराच्या मार्गावर चालतोयस त्याचप्रमाणे विवेकने लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता स्वतःचे ध्येय जिद्दीने पूर्ण केले.
पण विवेकला हे सगळं कसा कळलं? त्याला लहापणी त्याच्या आजीने मनाचे श्लोक शिकवले होते. आणि त्याचा अर्थही सांगितलं होता. हे ज्ञान त्याला आजपर्यंत मार्गदर्शन करतेय आणि कायमच करत राहील.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
English Translation
10th October is celebrated as World Mental Health Day. Considering the week following this I would like to take this opportunity to start a new series called “The Mind Gym”. We need healthy body to live a good life. I feel along with healthy body, a healthy and strong mind is very helpful in the journey of life. We are careful about doing physical exercise to maintain a healthy body. Similarly we must take care of our minds too. So come, join me, and let me take you to the mind gym to help our minds exercise.
I believe we Indians are truly blessed as we are gifted with the rich heritage including culture, vedas, puranas, shlokas, mantras and strotras. We chant these shlokas, stotras since childhood, yes ever since we did not even understand their meaning. As these mantras, stotras carry specific high frequency vibration, chanting them creates positive vibes in the surrounding which results in re-charging and rejuvenating us. Just by chanting these shlokas and mantras we get connected to the divine power very naturally. Just imagine how much it will benefit us if we chant them by understanding their meaning and implement that into our lives.
For this I have come up with this series in which I will try to present & elaborate 5 shlokas (mentioned above) each from Shri Manache Shlok by Shri Ramdas Swami. Many people get bored to learn shlokas, stotras. So I will be presenting this series in story form so that this rich heritage will reach as many people including our little kiddos. I am sure they will love it.
A boy named Vivek lived in a village called Rampur. Vivek’s parents were farmers. Vivek had completed all his education in his village. Vivek’s friends were planning to go to city for job search, however Vivek had already decided to live in village and do organic farming. Vivek did not like excessive use of chemical based products like fertilizers being used in farming as it degrades the crop quality and also affects mother earth a lot. Vivek's parents also wanted to do organic farming but they could not do it due to various factors like investments, profit-loss equations. Vivek decided to take that courageous step and do organic farming. His friends started ignoring him considering it as a foolish decision. Relatives, neighbours also started telling Vivek and his family that how risky his decision of organic farming is. Vivek ignored them and continued on his path by praying and giving gratitude to god as per his way of doing everything in life. He believed firmly that the work which will benefit and grow him, his family, society and nature will succeed for sure. Vivek started studying about organic farming and prepared a detailed plan of action. The money which his parents had saved for his future, Vivek decided to use that as an investment for organic farming. He purchased the organic seeds from the seed bank from the city nearby. He also took training to create organic farming products like fertilizers from the nearby city. Vivek did Rain Water Harvesting setup so that there was enough water available for the crops. Time passed by and the first set of crops were ready. Being organic, crops were of good quality and taste. Vivek knew that organic products are in demand in city. By consulting one of the professors from the college, where he learnt about organic farming products, he started to sell direct farmer to consumer. This helped him get more profit. Though on small scale, Vivek started his organic farming business successfully.
Moral
Shri Swami Ramdas guides us to pray and give gratitude to god before doing everyting, Vivek also practiced this as a way of his life.
Bhaktiyoga talks about praying to god and Karmayoga talks about taking appropriate timely actions. Shri Swami Ramdas guides us to balance Bhaktiyoga and Karmayoga in our lives. Vivek did not just prayed to god but also acted timely and appropriately which gave him good results.
Shri Swami Ramdas guides us to keep moving forward without worrying about criticism or approval from others while following truth and doing the good work. Vivek firmly believed in his good intention and kept moving on the path to complete his goal.
But do you wonder how come Vivek got to know all this wisdom? Well, he learnt all this from his grandmother in childhood. She had taught him Shri Manache Shlok along with the meaning. That light of wisdom is guiding Vivek till date and will continue to guide him forever.
Comments